सामाजिक चळवळीचे नुसते ज्ञान असून चालत नाही तर भानही हवे- प्रा.सुभाष वायदंडे

फोटो ओळ
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या अंबवडे (ता. जि.सातारा) शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे अंकुश भोंडे, तुषार सावंत ,कोमल खुडे ,संजय साठे ,प्राचार्यबाळासाहेब साठे, अनिल थोरात,सचिन खरात इत्यादी*
सातारा-आंबवडे (ता.जि.सातारा) सामाजिक चळवळ चालवत असताना समाजातील माणसं कशी गोळा करायची याचं फक्त ज्ञान असून चालत नाही तर, समाजाच्या प्राथमिक गरजा आणि विकासाचा नेमकेपणा कशात आहे याचं भान देखील असणे गरजेचे आहे तरच सामाजिक चळवळीला योग्य दिशा मिळून समाजाचा विकास होईल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी केले ते सातारा येथील आंबवडे शाखा उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होते .
यावेळी प्रा.वायदंडे बोलताना पुढे म्हणाले ज्ञानाची आणि भानाची जोड न लावता आल्यामुळे अनेक नेत्यांनी समाजाचं वाटोळं करून संघटनांचे पेवच करून टाकलं होतं यापुढे पुरोगामी संघर्ष परिषद सामाजिक चळवळीचा राज्यात एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे प्रवक्ते पांडुरंग रणदिवे ,पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ रतन लोखंडे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्वाती सौंदडे,सातारा जिल्हाध्यक्ष (वरिष्ठ)अनिल थोरात ,सातारा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय साठे, सातारा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, सातारा जिल्हा सरचिटणीस अधिक चव्हाण ,सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ लता साठे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अंकुश (भाऊ) भोंडे ,विजय भाऊ सावंत ,शंकरराव चव्हाण,अनिल डफळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मानले.