Uncategorized
भालेवाडी येथील विस्तारीत पाणी पुरवठा योजनेसाठी २८ लाख ७३ हजार निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मौजे भालेवाडी येथील विस्तारीत पाणीपुरवठा योजनेसाठी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण मंडळ सांगली यांनी २८ लक्ष ७३ हजार निधीसाठी तत्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.
उपलब्ध पाण्याच्या सुयोग्य नियोजनासाठी मंजुर निधीतून भालेवाडी गावाअंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्या तसेच वाढीव गावठाण मध्ये पाईपलाईन सुविधा करून घरोघरी नळ पाणीपुरवठा अशा स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. सदर निधी मंजूर होऊन ही विस्तारीत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आ. समाधान आवताडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असता आमदार महोदयांनी जनतेची ही मागणी लक्षात घेऊन सदर योजनेच्या अनुषंगाने संबंधित शासकीय विभागाकडे प्रयत्न करून हा निधी मिळवून दिला आहे.
यासाठी सोलापूर जि.प उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, समाजकल्याण माजी सभापती सौ. शिलाताई शिवशरण, जि.प. सदस्या सौ. मंजुळा कोळेकर, पंचायत समिती सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती श्रीमती विमल पाटील, पंचायत समिती सदस्या उज्वला मस्के, दामाजी शुगर संचालक सचिन शिवशरण, सरपंच सौ. सविता प्रताप गवळी, उपसरपंच सौ. मनिषा नितीन गवळी, ग्रामसेवक कुलकर्णी व आमदार कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी सुभाष ढेकळे – पाटील आदींनी पाठपुरावा केला.