पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मिरज शहराध्यक्षपदी अनिता गोकाक

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नीरज शहराध्यक्षपदी अनिता गोकाक यांना निवडीचे पत्र देताना पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष सौ स्वाती सौंदडे महापालिका क्षेत्र अध्यक्षा ज्योती गोकाक इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*मिरज* :- 28 जूलै बुधवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मिरज शहराध्यक्षपदी अनिता गणेश गोकाक (समतानगर)यांची निवड करण्यात आली राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांच्या सहीचे पत्र पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांच्या हस्ते व सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा ज्योती गोकाक यांचे उपस्थित देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ स्वाती सौंदडे म्हणाल्या भविष्यकाळात पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या साठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती महिलांना देऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करून महिला सक्षम बनवण्यासाठी तळागाळात जाऊन प्रबोधन केले जाईल.
यावेळी मिनाक्षी आवळे यांची समतानगर शाखा अध्यक्षा म्हणून निवड केली
शेवटी आभार महापालिका क्षेत्र अध्यक्षा ज्योती गोकाक यांनी मानले.


