20 जून रोजी वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
राज्यात होणाऱ्या बहुजन अल्पसंख्याकवर अन्याय अत्याचाराचा निषेध व आरोपीवर कारवाई करणेची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-महाराष्ट्रात दलितांवर अन्यायाची मोहीम सतत चालू आहे. याला शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार आहेत. खालीलप्रमाणे महाराष्ट्रात अन्यायाची मालिका चालू आहे. याबाबीचा निषेध व आरोपीवर त्वरित कारवाई करावी या मागणी साठी वंचित बहुजन आघाडीचे वतीने 20जून रोजी मोर्चाचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष बिराप्पा मोटे व शहराध्यक्ष राजू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. नांदेड जिल्ह्याती बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून तेथील जातीय व मनुवाद्यांनी त्यांची निर्घुण हत्या केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करत भय पसरविण्याचे कृत्य केले आहे. बोंढार येथील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देणेत यावी जेणेकरुन दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
२. तसेच मुंबई येथे सावित्रीमाई फुले वस्तीगृह येथे शिक्षणासाठी रहात असलेल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. सदर हत्येस जबाबबदार असणा-या सर्वावर कायदेशीर कारवाई करावी. ३. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे मातंग बांधवाची सावकारकीच्या वादातून हत्या करण्यात आलेली
आहे. सदर हत्येस जबाबदार असणा-या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
४. तसेच महाराष्ट्रात दलित व मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचार थांबणसाठी कडक कायदा करावा. अनेक ठिकाणी दलित मुस्लिम मॉबलिचिंगचे शिकार झाले असून कित्येक मुलीवर बलात्कार करणेत आलेले आहेत तरी संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
५. त्याचप्रमाणे आळंदी येथे इतिहासात पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाकडून वारकरी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आलेला व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये असून त्याची चौकशी करुन संबंधित दोषी अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. या व अन्य मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब. यांचे आदेशाने शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन सकाळी 11 वाजता निघणार असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी बहुजन समाजाने मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवहान करण्यात आले आहे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहखात्याच्या राजीनामा फडणवीस यांनी द्यावा ही मागणी करीत आहोत. सदर घटनांचा निषेध नोंदविण्याकरीता आम्ही दि. २०/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसिल कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. यांची नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले.यावेळी रवी सर्वगोड, जिल्हा उपाध्यक्ष,संतोष कांबळे ता. अध्यक्ष,लिंगेश्वर सरवदे ( युवा जि. संघटक)सचिन तुपलोंढे (युवा अध्यक्ष)मायाप्पा हेगडकर, माया खरे,सोमनाथ गायकवाड हनमंत आढाव,बाळाबाई डावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



