Uncategorized

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी संतोष रणदिवे तर कार्याध्यक्षपदी राजकुमार घाडगे

  • जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
  • श्रीकांत कसबे
  • पंढरपूर- श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरच्या अध्यक्षपदी दैनिक तरुण भारत संवाद चे प्रतिनिधी संतोष रणदिवे यांची तर दैनिक सकाळचे राजकुमार घाडगे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर निवडी करण्यात आल्या. श्रमिक पत्रकार संघाची बैठक पार पडली. यामध्ये संतोष रणदिवे एकमताने अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. रणदिवे हे सहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडले आहेत.यावेळी उपाध्यक्षपदी आरएनओ वृत्तसंस्थेचे दत्तात्रय देशमुख व राजू मिसाळ तर सचिव पदी दैनिक पंढरी संचार चे दत्तात्रय खटवटे यांच्या निवडी करण्यात आल्या.यासह कार्यकारी सदस्य पदी मंदार लोहकरे, सचिन कसबे, विनायक हरिदास, सुरज सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. वेळी जेष्ठ मार्गदर्शक अभय जोशी, प्रशांत आराध्ये, भारत नागणे, सचिन झाडे   महेश खिस्ते, सत्यविजय मोहोळकर, अतुल बडवे, सुनील दिवाण, अभिराज उबाळे, नितीन शिंदे, संतोष कुलकर्णी, श्याम दिवेकर, नागनाथ सुतार, महेश भंडारकवठेर व संकेत कुलकर्णी उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close