Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या युवती जिल्हाध्यक्षपदी सौ शुभांगी साळुंखे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली :- दि. १५ जुलै बामनोली( दत्तनगर ) पुरोगामी संघर्ष परिषदेच्या युवती जिल्हाध्यक्षपदी सौ. शुभांगी साळुंखे ( दत्तनगर) यांची निवड करण्यात आली. पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. यापूर्वी सौ शुभांगी साळुंखे यांनी कुपवाड शहराध्यक्षा म्हणून काम केले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना शुभांगी साळुंखे म्हणाल्या सामाजिक चळवळीमध्ये महिलांनी अग्रेसर राहून काम केल्यास सामाजिक अन्याय तर दूर होतीलच शिवाय चळवळीला बळकट होऊन महिला सक्षम झाल्यास ते राष्ट्राच्या हिताचेच होईल.