कोरोना पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना
सर्व नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्या...
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर, दि.08: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतानाच परंपरा कायम राहील याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. गोपाळपूर येथील स्वेरी संस्थेच्या सभागृहात ही बैठक झाली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला श्री. ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले.
श्री. शंभरकर यांनी शासनाने आषाढी वारीबाबत अतिशय स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी नेमून दिलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी. विशेषतः सार्वजनिक आरोग्य विभाग, पंढरपूर नगर परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग यांच्या विभागप्रमुखांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे. आषाढीवारी सोहळा नेटकेपणाने आणि कोरोना विषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.
मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000000