उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माँंटेसरी शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रमास मान्यता
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-श्री पांडूरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपुर संचालित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापुर कौशल्य विकास केंद्रा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या माँंटेसरी टिचर या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे.माफक फी मध्ये १०वी पास/नापास असणार्या विद्यार्थ्यांना ६ महिने कालावधी असणार्या कोर्स साठी प्रवेश उपलब्ध आहे. या संदर्भात अधिक माहिती प्रा.बागवान जे.एस व प्रा.नाईक एस व्ही यांचेशी संपर्क साधावा.
प्रस्तुत कोर्ससाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवहान उमा संकुलाचे कार्यवाह प्राचार्य डाँ.मिलिंद परिचारक, जनसंपर्क अधिकारी सुर्यकांत पारखे,शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ.विद्युलता पांढरे यांनी केले आहे.