स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
डिप्लोमाचा प्रवेश आता झाला सोपा, फक्त दहावीच्या आसन क्रमांकावर करता येणार रजिस्ट्रेशन

छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे,स्वेरी चिन्ह व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि. ३० जून २०२१) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया शुक्रवार, दि. २३ जुलै २०२१ पर्यंत चालणार आहे. या वर्षी प्रथमच दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांचा फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. दहावी परीक्षेच्या आसन क्रमांकासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या हायस्कूलशी संपर्क साधावा. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला आवश्यक आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.
डिप्लोमा इंजिनिअरिंग सन २०२१-२२ करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून स्वेरी पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे हे १४ वे वर्ष असून या कॉलेजने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ही प्रकिया दि.३० जून २०२१ पासून ते दि. २३ जुलै २०२१ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र. ९८९०५६६२८१, ९४२१९६०२५८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. सन २०२१-२२ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.