रांझणीत ग्रामपंचायत व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमान उभारले ‘कोविड केअर सेंटर’

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने रांझणी (ता. पंढरपूर) मध्ये रविवार दि.३१ मे रोजी सकाळी १० वाजता रांझणी ग्रामपंचायत व स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गोपाळपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३० बेडच्या ‘कोविड केअर सेंटर’चे उदघाटन रांझणीच्या सरपंच सौ.नीलाबाई रामचंद्र ढोले यांच्या हस्ते करण्यात आले.
रांझणी व परिसरातील रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होण्यासाठी व कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने उपचारासाठी रुग्णांची धावपळ होऊ नये आणि त्वरित उपचार मिळावेत यासाठी रांझणीमध्ये ग्रामपंचायत आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. यातून रांझणी मधील रुग्णांची धावपळ न होता गावातच उपचाराची सोय होणार आहे. याप्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, रांझणीच्या उपसरपंच सौ.उज्वला सत्यवान कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका सगुणा सरवदे व भिवाजी दांडगे, संभाजी कांबळे, दादा ढोले, हनुमंत दांडगे, बिभीषण अनपट, डॉ. युगंधरा शिंदे, डॉ. सचिन थिटे, डॉ. श्रीकृष्ण शिंदे, डॉ. घोगले, तलाठी एस.एम.इंगोले, विलास शिंदे, कैलास भोसले, जेष्ठ नागरिक, युवावर्ग, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, रांझणी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यापूर्वी स्वेरीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी, तावशी, गोपाळपूर आणि स्वेरी कॅम्पस मध्ये देखील ‘कोविड केअर सेंटर’ची स्थापना झाली असून स्वेरीने शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. यामुळे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.