Uncategorized

स्वेरीचा ‘न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार

करारातून दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर

छायाचित्र- स्वेरीचा तारापूरच्या ‘न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्याबरोबर नुकताच सामंजस्य करार झाला. यावेळी करारावर स्वाक्षरी करताना कंपनीचे निदेशक विनीतकुमार शर्मा, स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व अधिकारी वर्ग.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीट्युटचा एन.पी.सी.आय.एल., टी.एम.एस. अर्थात ‘न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, तारापूर महाराष्ट्र साईट’ सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
एन.पी.सी.आय.एल., तारापूर महाराष्ट्र साइट (टीएमएस) च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस.आर) कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकासासाठी खेड्यांमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने बोईसर (जि. पालघर) येथे एन.पी.सी.आय.एल., तारापूर महाराष्ट्र साइट व स्वेरीच्या संयुक्त विद्यमाने आकृती सेंटर ची स्थापना करण्यात येणार आहे. या आकृती सेंटर च्या माध्यमातून ग्रामीण भागात उद्योग, आरोग्य, शेती, वैद्यकीय सुविधा, अन्न परिक्षण, प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, पाणी तंत्रज्ञान आदी क्षेत्रात कार्य केले जाणार आहे.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून स्वेरी बोईसर येथील ‘आकृती इनक्युबेशन सेंटर’च्या उभारणीसाठी आणि पुढील कार्यवाही साठी मदत करणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर कराराच्या माध्यमातून या ‘आकृती इनक्युबेशन सेंटर’च्या ठिकाणी स्वेरी विविध सुविधा निर्माण करणार आहे. या सुविधांमध्ये विद्यार्थी व नव उद्योजकांना मार्गदर्शन, विविध उपक्रमात प्राध्यापकांचा सहभागी करून प्रशिक्षण देणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.
या आकृती सेंटर च्या माध्यमातून माती सेंद्रिय कार्बन शोध आणि चाचणी किट,फोल्डेबल सोलर ड्रायर आणि सोलर ड्रायर, वॉटर प्युरिफायर, सूक्ष्म कडुलिंब बायो – कीटकनाशक, स्वयंपाकघरातील कचरा आणि मंदिरातील कचरा यासाठी जलद बायो-कंपोस्टिंग तंत्रज्ञान, ऑर्गनोफॉस्फेट आणि ऑर्गन कार्बामेट कीटकनाशक शोधण्यासाठी बायोसेन्सर किट, कोळंबीच्या विकासासाठी पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान, हँडहेल्ड 12-चॅनेल, टेली-ईसीजी उपकरणे, बियाणे निर्मिती आणि वितरण इ. बाबींवर काम केले जाणार आहे.
यामुळे विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांना संशोधन क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी चालना मिळणार आहे. स्वेरीतील प्राध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा संशोधनातील अनुभव विचारात घेवून व ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्वेरी करत असलेले कार्य पाहून एन.पी.सी.आय.एल. ने स्वेरी सोबत हा सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर ‘न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे साईट निदेशक विनीतकुमार शर्मा व स्वेरी तर्फे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारामुळे संशोधनास व उद्योजकता वाढीस चालना मिळणार आहे. न्युक्लीअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ सोबत स्वेरीमधील प्राध्यापक व संशोधक यांची उद्योजकता विकासाबाबत देवाण-घेवाण होणार आहे. यापूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर अनेक संस्थांसोबत सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत. अशा
करारांमुळे स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच, संशोधन आणि उद्योजकता विकासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या हेतूने १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरवात झाली. तेथून पुढे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे एवढ्यावरच न थांबता त्यांचा कल संशोधनाकडे कसा वळविला जाईल हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने संस्थेने पाऊले उचलली आहेत. आता स्वेरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागाचा विकास कसा करता येईल यावर भर देत आहे. याच कारणामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व परराज्यातील विद्यार्थी देखील स्वेरीकडे शिक्षणासाठी वळत आहेत. भारत सरकारच्या भाभा अणूसंशोधन केंद्रासह इतर अनेक संस्थाबरोबर झालेल्या करारामुळे आजमितीस संशोधनासाठी रु. सात कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आहे. स्वेरीचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंट आणि विद्यापीठात सर्वोच्च निकाल मिळविण्याबरोबरच संशोधनाकडे वळत आहेत ही सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रालादेखील गौरवाची बाब आहे. या करारामुळे स्वेरी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कंपनीने यासाठी स्वेरीला २ कोटी पेक्षा जास्त रुपयांचे अनुदान मंजूर केले असून असे अनुदान मिळवणारे सोलापूर जिल्ह्यातील स्वेरी हे एकमेव महाविद्यालय आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे व डॉ. आर.एस. पवार यांनी परिश्रम घेतले. हा करार झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन के

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close