Uncategorized

पंढरपूरातील सरगम चौकात कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुतळा उभारण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

सरगम चौक व संभाव्य उड्डाण पुलास देखील औदुंबर आण्णा यांचेच नाव द्यावे अशी ही मागणी आहे.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- पंढरपूर तालुक्याच्या औद्योगिक क्रांतिचे जनक,माजी आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा सरगम चौकात उभा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष लखनराज थिटे यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन दिलेले आहे.

पंढरपूर तालुक्याचे पहिले काॅंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांनी कृषी – औद्योगिक क्रांतिचा पाया पंढरपूर तालुक्यात घातला आहे.पंढरपूर शहरातील सरगम चौकातील एक रस्ता हा कर्मवीर आण्णांनी वसवलेल्या नवी पेठ कडे जातो तर दुसरा श्री विठ्ठल कारखान्याकडे व तीसरा श्री विठ्ठल हाॅस्पीटलकडे त्यामुळे सरगम चौक हा कर्मवीर आण्णांच्या पुतळ्यासाठी अत्यंत योग्य अशी जागा आहे.सदर चौकाला कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील चौक असे नाव देण्यात यावे व त्या ठिकाणी त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.तसेच,भविष्यात त्या ठिकाणी उड्डाणपुल झाल्यास सदर पुलास ही कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील उड्डाणपुल असे नाव देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

सदर मागण्यांबाबत तात्काळ योग्य तो निर्णय न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्यावतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही सदर निवेदनात संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आलेला आहे.याप्रसंगी संभाजी ब्रिगेड शहरउपाध्यक्ष शनी घुले,ओंकार चव्हाण,विश्वजीत सुरवसे,गुरु थिटे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close