श्री चेस अकॅडमी चे बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक यश

श्री चेस अकॅडमी चे यशस्वी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे राजूभाई मुलाणी ,बाळासाहेब आराध्ये,नानासाहेब देवकते, मिलिंद बडवे, युवराज पोगुल
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-येथील श्री चेस अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्यस्तरावर नेत्रदीपक यश मिळवले आहे.यामध्ये विभागीय स्तरावर श्रीहरी सुतार, आदित्य मोरे,सुहान जाधव, स्वरूप,तूपसांगवे,अखिलेश खरात या विद्यार्थ्यांना यश मिळाले असून जिल्हास्तरावर अद्वितीय देशपांडे, शर्वरी नकाते, शौर्य साळुंखे,ईशान इरकल, निहाल नारनवरे,अभिराज पवार व ऐश्वर्या शिंदे यांना यश मिळाले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यासाठी पंढरपूर येथील विवेक वर्धिनीचे शिक्षक व प्रसिद्ध पत्रलेखक राजूभाई मुलाणी व सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब आराध्ये हे उपस्थीत होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी अकॅडमी चे प्रमुख मार्गदर्शक, प्रशिक्षक नानासाहेब देवकते,मिलिंद बडवे,युवराज पोगुल हे उपस्थित होते तसेच डॉ. नितीन देशपांडे,सुहास जाधव , राहुल आर्वे तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.