पुरोगामी संघर्ष परिषदेच्या युवती जिल्हाध्यक्षपदी कु.नयना लोंढे
जिल्हाउपाध्यक्षपदी नंदिनी श्रीखंडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपूर:-पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी सामाजिक चळवळीमध्ये युवक व युवतींनी सक्रिय सहभाग घेतला तर सामाजिक चळवळ नेटाने उभा राहून समाजाचे परिवर्तन होण्यास दिशा मिळू शकते हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या युवती आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी कु नयना लोंढे यांची निवड केली आहे त्यांना निवडीचे पत्र नुकतेच दिले.
निवडीनंतर कु. नयना लोंढे म्हणाल्या सामाजिक चळवळीमध्ये युवतींचे वैचारिक प्रबोधन करून सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करेन.
जिल्हाउपाध्यक्षपदी नंदिनी श्रीखंडे
सांगली:-:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला युवती जिल्हा उपाध्यक्ष पदी (कुपवाड )येथील नंदिनी श्रीखंडे यांची निवड करण्यात आली. पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशाने सांगली जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा अक्षय खुडे व जिल्हा उपाध्यक्ष मा खंडू कांबळे यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना सौ. नंदिनी श्रीखंडे म्हणाल्या पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्या मध्ये समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम करीत असून संघटनेनं माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे त्याला पात्र राहून सामाजिक बांधिलकी म्हणून मी महिलांच्या साठी वेळ देऊन सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेन.