पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मुंबई प्रदेश संपर्क प्रमुखपदी धनंजय वायदंडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
कडेगाव:- हिंगणगाव (ता. कडेगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते मा. धनंजय शंकर वायदंडे यांची संघटनेच्या मुंबई प्रदेश संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नुकतेच त्यांना पत्र पुरोगामी संघर्ष परिषदेचे संंस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी दिले. धनंजय वायदंडे हे गेली 15 वर्ष विविध कार्याच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत. मुंबई प्रदेशशी त्यांचा सामाजिक कार्यातून दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांची मुंबई प्रदेश संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीनंतर बोलताना धनंजय वायदंडे म्हणाले मुंबई प्रदेश मध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे विचार व काम तळागाळातील समाजातील सर्वसामान्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असून प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्व भविष्यात पुरोगामी संघर्ष परिषदेचे एक आव्हान निर्माण करेल असे सांगितले .