शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्का बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ च्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व महाविद्यालयाना निवेदन देण्यात आले

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या वतिने मतदार संघातील सर्व महाविद्यालयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १)सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात(Tuition Fee)सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत (Library, Laboratory,Internet,Development,Gymkhana, Education Tour, Annual Functions, etc.)त्याचे शुल्क आकारू नये.
२.ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.
(विद्यार्थी आज ना उद्या आपले पैसे देणार आहे.तोपर्यंत त्याची महत्वाची कागदपत्रे आपल्याकडेच राहणार आहेत.)
३.नर्सरी ते १० वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य(पुस्तके, वह्या इ.)शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने(#CBSE,#ICSE,#STATE)जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत.दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये.(संबंधित बोर्डा कडे तक्रार गेल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते) या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूरचे पदाधिकारी उपस्थित होते
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष सागर पडवळ,कार्याध्यक्ष राकेश साळुंखे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर कार्याध्यक्षअमृताशेळके,उपाध्यक्षओंकार जगताप,उपाध्यक्ष ,शुभम साळुंखे सरचिटणीस,ओंकार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



