पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने अन्नदान करून तथागत गौतम बुद्धांना अभिवादन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सागली:-बुधवार दि.२७ – पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने कोरोना काळातील गरज ओळखून पारंपारिक पद्धतीला फाटा देत तथागत गौतम बुद्धांची जयंती “अन्नदान” करून साजरी करण्यात आली यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या,” जगाला शांततेचा व भारताला समतेचा संदेश देणारे स्वातंत्र्य, समता ,बंधुता या तत्त्वावर आधारलेल्या बौद्ध धर्माचे संस्थापक मध्यममार्गी, तत्त्वज्ञानी बुद्धांचे मार्गदर्शन भारताला वाटचाल करण्यास मार्गदर्शक राहणार आहे.
तसेच यावेळी मिरज तालुका अध्यक्षा सौ.रतन लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या वयाच्या पस्तिसाव्या वर्षी सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले बुद्धाने बुद्धिप्रामाण्य ,प्रज्ञा, शील करूणा, मैत्री ,बहुजनांचे हित आणि सुख या संकल्पनांवर आधारलेल्या व माणसामाणसातील सदाचारावर भर देणाऱ्या बौद्ध धर्माची स्थापना केली.
यावेळी सांगली जिल्हा शहर अध्यक्षा सौ संगीता साठे ,महापालिका क्षेत्राचा अध्यक्षा सौ .ज्योती गोकाक वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सावळा खुडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे मिरज तालुका अध्यक्षासौ रतन लोखंडे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले .सदर कार्यक्रमास विजय सौंदडे , वासू गोकाक ,श्रीमती द्रौपदी सौंदडे,गिरिश सौंदडे,दिपक सौंदडे,पूजा सौंदडे यांचे सहकार्य लाभले.
कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने तथागत गौतम बुद्धांना अभिवादन
इचलकरंजी:- कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषद महिला आघाडीच्या वतीने इचलकरंजी सांगली रोड आमराई मळा या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ ज्योती साठे यांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी शोभा पारधे यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमास पुनम कुरणे , नीता वाघमारे, सुरेखा फाळके ,भारती कुरणे ताराबाई फाळके इत्यादी महिला उपस्थित होत्या
शेवटी आभार भारती साठे यांनी मानले.