—तर धडक मोर्चा काढणार:अश्विनी कांबळे
पुरोगामी संघर्ष परिषदेचे मिरज तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
*मिरज:-दि.24 मे आज सोमवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने मिरज तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तालुका कार्याध्यक्षा सौ. आश्विनी कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन नायब तहसीलदारश्रीधर राजमाने यांना देण्यात दिले.
1)कोरोना महामारीचा विचार करता मायक्रो फायनान्स कडील सर्व कर्ज माफ करण्यात यावं.
2) बचत गटाला व रोजंदारी मजुरांना राष्ट्रीय बँकेकडून व्यवसायासाठी बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळावे.
3) विधवा व परित्यक्त्या महिलांना पुढील दोन वर्षे दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळावे.
आशा मागण्या करण्यात आल्या.
सदर निवेदन सांगली जिल्हा युवक आघाडीचे उपाध्यक्ष मा. खंडू कांबळे व सांगली मिरज महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सौ. ज्योती गोकाक यांच्या उपस्थितीत देण्यात आले सदर मागण्या 15 दिवसाच्या आत मंजूर न झाल्यास संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्याचा इशारा अश्ववीनी कांबळे यांंनी दिला आहे.