Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी गिरीधर खंबाईत

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
——————————————————
पेठ(नाशिक):-दि.24मे- पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी निरगुडे (ता पेठ )येथील युवक गिरीधर मोहन खंबाईत यांची पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवडीचे नुकतेच त्यांना पत्र दिले.या निवडीबद्दल गिरीधर खंबायत यांचे पंचक्रोशी मध्ये अभिनंदन होत आहे. निवडीनंतर बोलताना गिरीधर खंबाईत म्हणाले आमचा समाज हा शासकीय सोयी पासून दूर राहिलेला आहे. समाजाला शासकीय सोयी मिळवून देण्यामध्ये मी माझ्या पदाचा उपयोग करीन आणि समाजावर जर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून देईन.