शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींचा दगडाला काळी टोपी घालून दहन करत केला निषेध
भाजपाला राज्यातून हद्दपार करण्याची वेळ आलीय-श्रीकांत शिंदे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडी च्या वतीने कोश्यारी यांचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी कोश्यारी आहे का ? विषारी या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. यावेळी दगडाला काळी टोपी घालून त्याचे दहन करत राज्यपाल यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
राज्यपाल पदावर काम करत असताना ज्यांच्याकडे राज्याचे पालक म्हणून भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाहिले जाते पण गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल वारंवार अपमानकारक शब्द वापरून थोर पुरुषांचा अवमान करण्याचे काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीला फक्त मतासाठी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर करून राजकारण करणार असेल तर 2024 ला या भारतीय जनता पार्टीला राज्यातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधींनी खरे वक्तव्य केले तर संबंध भाजपा रोडवर उतरली पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना मात्र भाजपा का ? गप्प बसली आहे याच उत्तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी करत कोश्यारी यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,शिवसेना महिला संघटक पूनम अभंगराव ,शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख,ओबीसी सेल महिला आघाडी जिल्हाध्यक्ष साधना राऊत,युवती प्रदेश सरचिटणीस चारुशीला कुलकर्णी, उद्योग व्यापार सेलचे तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर, रणजित पाटील ,विजयकुमार काळे,मा. नगरसेवक मुहम्मद उस्ताद, शिवसेना उपशहरप्रमुख तानाजी मोरे, सचिन सोलंकी, हनुमंत बागल, गिरीश चाकोते, सुरज पेंडाल, संगीता पवार, सारीका जाधव, मंजुळा धोडमिशे, संगीता माने, अनिता पवार, पुर्वा पांढरे, सुनिता माने, निलेश कोरके, रशीद शेख, जाकीर शेख, बापू शिंदे, विशाल सावंत, स्वप्नील जगताप, यश महिंगडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.