माढा मतदार संघात माझा दोन भाजपशी लढा -रमेश बारसकर
बीजेपी चे संघर्षा ऐवजी समझोत्याचे राजकारण सुरु

जोशबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-माढा लोकसभा मतदार संघात माझा लढा हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व नुकतेच भाजप मधून येऊन राष्ट्रवादी शरद पवार कडून उमेदवारी लढणाऱ्या दुसऱ्या भाजप यांचे उमेदवारा सोबत आपला लढा असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा असून जनता आपणासच मतदान करेल व आपण विजयी होऊ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे माढा मतदार संघातील उमेदवार रमेश बारसकर यांनी पंढरपूर येथे पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
या मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून या पूर्वीच्या खासदारांनी विशेष प्रयत्न केले नाहीत आपण विजयी झालो तर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलवून काया पालट करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला उमेदवारी दिली आहें.
गृहमंत्री फडणवीस हें बीजेपीचा उमेदवार निवडून आणणे साठी तोडा आणि फोडा राजकारण करीत असून अभिजित पाटील यांचा कारखाना अडचणीत आणून ऐन निवडणुकीत त्यांना बीजेपी मध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु असून काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते यांना सुद्धा गळाला लावले आहें. बीजेपी मैदानात येऊन संघर्ष करेल असे वाटले होते पण तसे दिसत नाही फक्त समझोते करुन फोड तोड करुन ई डी व विविध संस्थेचा वापर करुन दडपशाहीचे राजकारण करत आहे असा आरोप रमेश बारसकर यांनी केला. महाआघाडीचे अनेक पदाधीकारी निवडणुकी पूर्वी बीजेपी मध्ये गेले. हातात घालून राजकारण करत आहेत. मात्र आमचे वर बी टीम असल्याचा आरोप करीत आहेत. असेच आरोप अरविंद केजरीवाल यांचेवर होत होते पण त्यांनी दोन राज्यात सरकार आणले.
पुढे ते म्हणाले संविधानाची मोडतोड करुन व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या व वंचित बहुजन आघाडीला बी टीम संबोधणाऱ्याना लोक चांगले ओळखतात. मतदार संघातील ओबीसी सहित सर्व मतदार प्रस्थापित पक्षाच्या मागे न जाता वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राहुल चव्हाण शिलवंत क्षीरसागर आदी उपस्थित होते.