कोरोनाची सद्यस्थिती पहाता पंढरपूर शहराला दररोज1000 कोरोना ची लस मिळावी ही नगरपालिकेची मागणी
नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची मागणी

जोशाबा वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल, ) अपुरी पडत असुन त्यांच्यावर खुप ताण पडत आहे.
पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाख असुन शासनाकडुन सात दिवसातुन फक्त 200 ते 300 कोव्हिड 19 च्या लसीचा पुरवठा नगरपरिषद ला सध्या होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन नागरीकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. व दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराची 1 लाख लोकसंख्या विचारात घेता दररोज 1000 कोव्हिडची लस नगरपरिषदेला मिळणे अपेक्षित आहे तरी पंढरपूर नगर परिषदेला दररोज 1000 कोरोना ची लस मिळावी अशी मागणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे