दलित स्वयंसेवक संघ, सोलापूर शहर अध्यक्षपदी “अमर पवार “यांची एकमताने नियुक्ती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
:-श्रीकांत कसबे
सोलापूर दिनांक :- “दलित स्वयंसेवक संघ” यांचेवतीने शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी डी.एस.एस. सोलापूर शहर अध्यक्ष पदी अमर ज्ञानदेव पवार यांची संघ प्रमुख प्रदेश अध्यक्ष मा. विजय पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने निवड करण्यात आली.
आपण छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची चळवळ सोलापूर शहरामध्ये अधिक गतिमान करण्यासाठी व संघाचे ध्येय धोरण बहुजनांपर्यंत पोहोचविण्याकरीता त्यांची सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सदर निवडीप्रसंगी प. महाराष्ट्र अध्यक्ष- सूर्यकांत केंदळे, प्रदेश उपाध्यक्ष हणमंतु पवार, प्रदेश उपाध्यक्ष- नाना मोरे, प्रदेश संघटक- राजू कसबे, जिल्हा अध्यक्ष- दत्ता अडसुळ, जिल्हा कार्याध्यक्ष- अशोक कांबळे,माजी अध्यक्ष नानाजी घोडके, शहर सचिव विश्वेंद्र मोरे, युवक प्रमुख अमोल पोटफोडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.