पंढरपूर तालुक्यात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणार. चेअरमन – कल्याणराव काळे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर (प्रतिनिधी) दि.29- वसंतदादा काळे प्रतिष्ठान मार्फत वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे 100 बेड व वाडीकूरोली ता . पंढरपूर येथे ग्रामपंचायत स्थरावरील 100 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली असून परवानगी मिळताच शहरी व ग्रामीण भागातील रुग्णासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर माफक दरात कोविड केअर सेंटर सुरू करणार आसल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे गेल्या 10 महिण्यापासून कोविड हॉस्पिटल सुरू असून हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तेथे 45 बेड उपलब्ध आहेत मात्र रुग्ण संख्या वाढली आसल्याने बेड उपलब्ध होत नाहीत .यासाठी *आणखी बेड वाढवण्यासाठी विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जागा उबलब्ध व्हावी म्हणून प्रस्ताव दिला आहे परवानगी मिळताच तेथे 100 बेड चे व वाडीकूरोली येथे 100 बेडचे असे 200 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू करणार आसल्याचे सांगितले आहे*.
पंढरपूर शहर व तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाही तसेच 65 एकर, गजानन महाराज मठ, येथील कोविड सेंटर मध्ये ही जागा शिल्लक नाही रुग्ण संख्या दररोज झपाटयाने वाढत असल्याने ऑक्सिजन बेड आणि प्राथमिक उपचारासाठी सुद्धा लोकांना वणवण फिरावे लागत आहे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने प्राथमिक स्थरावर उपचाराची सोय होणार आहे 200 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याने पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे .