Uncategorized
पुरोगामी संघर्ष परिषद पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी सौ छाया मोरे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिरज- गेली 15 वर्ष समाजकारण व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांच्या साठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, तंटामुक्ती ते महिला अन्याय निवारण समिती, बचत गट व शासकीय योजना यांच्या माध्यमातून महिलांच्या साठी अहोरात्र काम करणाऱ्या एरंडोली ता मिरज ग्रामपंचायतीच्या उप सरपंच सौ छाया मोरे यांच्या कार्याची दखल घेऊन पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी त्यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस पदी निवड करून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी संधी निर्माण करून दिलेली आहे या निवडीबद्दल सौ छाया मोरे यांचे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.