Uncategorized

मागासवर्गीय योजना निधी परत पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांचा हिसाब करू

नुतन जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे यांचा इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
सागली:-*सांगली जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाकडील मागासवर्गीयांचा विकास योजनांचा निधी शासनाला परत पाठवणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन, पडताळणी करून, दोषी आढळणाऱ्या आशा निक्रिय अधिकार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करून हिसाब करू असा खणखणीत इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे यांनी सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर केलेल्या निवडीमध्ये दिला.
सांगली येथे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांच्या हस्ते अक्षय खुडे यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अमर शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष सावळा(आण्णा) खुडे, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ स्वाती सौंदडे ,सांगली जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ संगीता साठे ,आटपाडी तालुका अध्यक्ष सागर लांडगे, मिरज तालुका अध्यक्ष पृथ्वीराज आवळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
शेवटी आभार मिरज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रतन लोखंडे यांनी मानले.


आमचेकडे सेंद्रीय केसर किरकोळ आंबा ठोक व  किरकोळ योग्य दरात मिळेल.(१५एप्रिल ते ३१पर्यंत संपर्क साधावा)

जि.के.गायकवाड, प्रतिभाताई परिचारक नगर टाकळी रोड ,पंढरपूर. मो.नं.८६६८८३९२९०

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close