पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील रणधुमाळी
एकास जागा टिकवायची आहे तर दुसऱ्यास खेचायची आहे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर(जोशाबा टाईम्स वृत्त):-दिवंगत आ.भारत भालके यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक लागली असुन येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होण्यापासून सुरु झालेली चर्चा कोण विजयी होणार इथपर्यंत उत्सुकतेची बनली आहे.
महाआघाडी मित्र पक्षाने दिवंगत आ.भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षाने उद्योजक समाधान आवताडे यांना उभे केले असुन आ.प्रशांतराव परिचारक गटाने आपली ताकत त्यांचे मागे उभी केली आहे. त्यामुळे हि निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची बनली आहे.
दोन्ही बाजूंनी आजी-माजी मंत्री,खासदार, आमदार जेष्ठ नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.काही जण तर तळ ठोकून आहेत.
निवडणूक मैदानात या दोन उमेदारांसोबतच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिराप्पा मोटे,अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे, अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी ही प्रचारात मुसंडी घेतली असुन लक्षवेधक प्रचारामुळे वरील दोन्ही उमेदवारा समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.
बहुजन मुक्ती पार्टीचे अँड.सिताराम सोनवले,बळीराजा पार्टीचे डॉ. राजेंद्र भोसले यांचेसह १९उमेदवार मैदानात आहेत. प्रत्येकांनी प्रचार व प्रसारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
वरीलपैकी कोणते उमेदवार किती मत घेतात या वर विजयी होणाऱ्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
भगिरथ भालके यांना दिवंगत आमदार भारत भालके यांनी तिन वेळा मिळवलेली जागा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर समाधान आवताडे यांना हि जागा खेचायची असल्याने जास्तीची ताकत लावावी लागणार आहे.मतदार नेमका कोणाला आपले बहुमुल्य मत देऊन विजयी करणार याकडे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघच नव्हे तर संपूर्ण महाराष्टाचे लक्ष लागले आहे.
“आमचेकडे सेंद्रिय केसर आंबा ठोक व किरकोळ विक्री योग्य दरात केली जाते
१५एप्रिल ते ३१मे पर्यंत संपर्क साधावा.
जि.के.गायकवाड, प्रतिभाताई परिरारक नगर टाकळी रोड पंढरपूर. मो.नं.8668839290″