Uncategorized
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागेच्या पात्रात राबवली स्वच्छता मोहीम
समाजसेवक राहुल परचंडे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंंढरपूर (प्रतिनिधी) : समाजसेवक राहुलदादा परचंडे मित्र परिवाराच्या वतीने माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागेच्या वाळवंटाची व पात्राची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सध्या चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे, काही दिवसांपूर्वी पंंढरपूर नगरपरिषदेच्या नगरसेविका कुसूमताई परचंडे या चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्या होत्या तेंव्हा त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. यानंतर त्यांनी मुलगा समाजसेवक राहुल परचंडे यांना चंद्रभागेची स्वच्छता करण्याची ईच्छा व्यक्त केली. यानंतर तत्परतेने समाजसेवक राहुल परचंडे मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागेच्या स्वच्छतेची मोहीम राबवली.
चंद्रभागेच्या वाळवंटात साठलेले कच-याचे ढीग, तीरावर साठलेले व पाण्यात पसरलेले चिंध्यांचे ढीग, निर्माल्य गोळा करून ही स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी राहुल परचंडे यांनी व कार्यकर्त्यांनी स्वतः नदीपात्रातून चिंध्यांचे ढीगच्या ढीग बाहेर काढले.

यावेळी बोलताना नगरसेविका कुसूमताई परचंडे म्हणाल्या की, चंद्रभागेची स्वच्छता ही नियमित होणे गरजेचे आहे, याचबरोबर भाविकांनीही नदीमध्ये निर्माल्य, कपडे न टाकता एका ठिकाणी टाकावा, दशक्रिया विधी कुठेही केले जातात व मयताचे कपडे वापरातल्या वस्तू नदीच्या पाण्यात टाकल्या जातात हे कुठं तरी थांबायला हवं. चंद्रभागेच्या वाळवंटात कुठेही कचरा कुंड्या नाहीत त्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कचरा, निर्माल्य व दशक्रिया विधी नंतरचं साहित्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी आपण करणार आहोत असं सांगितलं. आमचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या उपक्रमानंतर खरंच समाधान वाटत असल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं.
नगरसेविका सौ. कुसूमताई परचंडे, नगरसेविका सौ.अर्चनाताई गणेश शिंदे, नगरसेविका सौ.संध्याताई मालोजी शेंबडे, नगरसेविका सौ.शिलाताई शरद माने, सौ.सोनाली राहुल परचंडे, सौ. मिनाक्षी राधेश परचंडे, सौ. जयश्री जयवंत परचंडे, सौ. शिलाताई कैलास परचंडे, अंकुश परचंडे, विकी परचंडे, सुनील नवले, मंगेश सुरवसे, सुरेन भाट, निखील परचंडे, राजु भोले, अश्विन कोळी, राजु घंटी, अमोल डोळे, दत्ता घोडके, पप्पु नलवडे, वेदांत खंडागळे, सुमीत शहा, शंकर पवार, राहुल ढाळे, अतुल हरिदास, चैतन्य परचंडे, रामा आडसुळ, शैलेश संगीतराव, उदय परचंडे, शैलेश वांगीकर, व नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला होता.

………………………..



