Uncategorized

महाराष्ट्र शासनाचे सुकाणू समिती सदस्य डॉ. अनिल राव यांची स्वेरीला सदिच्छा भेट

छायाचित्र- सुकाणू समिती सदस्य डॉ.अनिल राव यांनी स्वेरीला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सोबत डावीकडून कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व अभिजित पाटील.

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जळगाव येथील बहुशाखीय महाविद्यालय असलेल्या मूळजी जेठा कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.अनिल राव यांनी सदिच्छा भेट दिली. ते महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे सदस्य असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, तसेच वाणिज्य, संगणक व्यवस्थापन या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. डॉ.अनिल राव हे एक व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी सर्वप्रथम त्यांचे स्वागत केले. डॉ. राव यांनी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (डिप्लोमा व डिग्री) कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा व डिग्री), स्वेरी लॉ कॉलेज,आदी पाचही कॉलेज संबंधी माहिती जाणून घेतली तसेच स्वेरीतील संशोधनाबाबत सविस्तर माहिती देखील जाणून घेतली. संशोधनाकरिता मिळालेला निधी व त्यातील प्रगती पाहून डॉ. राव हे भारावून गेले. त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जळगाव येथील एम. जे. कॉलेजमध्ये केली. या शिक्षण संस्थेत वाणिज्य आणि करआकारणीचे व्याख्याता म्हणून त्यांनी काम केले तसेच त्यांनी ऑडिट, कर आकारणी, अंतर्गत प्रणाली आणि वित्त या विषयात विशेष प्राविण्यासह एक व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून देखील काम केले आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्राला स्वतःला समर्पित करण्याच्या उद्देशाने, त्यांनी ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून असलेला आपला ‘प्रॅक्टिसचा दाखला’ (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस) आणि प्रस्थापित व्यावसायिक कारकीर्द सोडून दिली तसेच १९९६ मध्ये वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी ते एम. जे. कॉलेजचे प्राचार्य बनले. प्राचार्य पदावर १८ वर्षे काम केल्यानंतर, २०१४ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण व सहभाग नोंदवण्यासाठी तसेच नामांकित विद्यापीठे व संस्थांशी यशस्वी सहयोगात्मक संशोधन संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आहे. यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम (युके), इटली, इस्रायल, थायलंड, चीन, एस्टोनिया, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, कॅनडा, फ्रान्स आणि फिनलंड या देशांचा समावेश आहे. याचा परिणाम म्हणून, पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी (अमेरिका), मिलान इटली तील पार्मा युनिव्हर्सिटी, नॅशनल सायन्स फाउंडेशन (अमेरिका) इत्यादींच्या सहकार्याने अनेक संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. तसेच, देशभरातील विविध महाविद्यालयांच्या ‘नॅक’ मूल्यांकनासाठी त्यांनी अनेकदा ‘पिअर टीम’चे (मूल्यांकन समितीचे) सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशने जमा आहेत. त्यांनी लेखांकन (अकाउंटंन्सी), ई-कॉमर्स, संगणक आणि महाराष्ट्रातील उच्चशिक्षण या विषयांवरील पुस्तकांचे सह-लेखन देखील केले आहे. ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज’चे (अभ्यास मंडळ) अध्यक्ष आणि नामांकित सदस्य म्हणून कार्यरत होते. ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६’ च्या मसुदा निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
बाटु ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, सीओईपीटी यु आणि केकेएसयु या विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या विशेष समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या विविध विशेष समित्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक विद्यापीठांच्या ‘परिक्षा योजना’ (पर्स्पेक्टिव्ह प्लॅन्स) बाबत मार्गदर्शक निकष विकसित करण्यासाठी नेमलेली डॉ. नरेंद्र जाधव समिती तसेच याच योजनांच्या निर्मितीसाठीची डॉ. के. बी. पाटील समिती आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांसाठी ‘सामायिक नियमावली’ (कॉमन स्टॅटयूट्स ) तयार करण्यासाठीची डॉ. आर. एस. माळी समिती यांचा समावेश आहे. सध्या ते ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (एनईपी) अंमलबजावणी कार्यदलाचे (टास्क फोर्स ) समन्वयक सदस्य आणि ‘वित्त व लेखा संहिता’ (फायनान्स अँड अकाउंट कोड) मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. ते ‘जळगाव जनता सहकारी बँक’ या प्रतिष्ठित अनुसूचित शहरी सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. या बँकेच्या महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये ४३ शाखा असून बँकेची एकूण उलाढाल ४ हजार कोटी रुपये इतकी आहेत. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘कॉलेज ऑफ सुपरवायझर्स’ मध्ये अतिथी प्राध्यापक आहेत. ते ‘विद्यापीठ विकास प्रबोधिनी’ या राज्यस्तरीय संस्थेचे संयोजक आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीताची विशेष आवड असलेल्या डॉ. राव यांनी महाविद्यालयीन काळात फुटबॉल, हॉकी आणि खो-खो या खेळांमध्ये सलग पाच वर्षे आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इनचार्ज डॉ. एम. एम. पवार, डिग्री कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्यासह अभिजीत पाटील, अधिष्ठाता, विभागप्रमुख शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक आदी उपस्थित होते.

चौकट: डॉ. राव यांनी स्वेरीबाबत जाणून घेऊन स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन’ तथा “ट्रिपल पी इ’, स्वायत्त अभ्यासक्रम, अटल कम्युनिटी इनोवेशन सेंटर, परम शवक सुपर कंप्यूटिंग सुविधा, कॅडेन्स सॉफ्टवेअर, आयडिया लॅब आदि बाबींचे विशेष कौतुक केले.

.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close