Uncategorized

पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा;

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचा पुढाकार; २२ प्रतिज्ञांचे सामूहिक शपथग्रहण करून महोत्सवाची सांगता

 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर, प्रतिनिधी/लखन सोनवणे :-अशोक विजयादशमी ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने धम्म रॅली काढून उत्साहात साजरा करण्यात आला.  समता, न्याय, बंधुता, प्रेम आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवात विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.
धम्म रॅलीचा प्रारंभ सारनाथ बुद्ध विहार येथून तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव व नगरसेवक डी. राज सर्वगोड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्म रॅलीला सुरुवात झाली.
सारनाथ बुद्ध विहार येथून निघालेली धम्म रॅली सांगोला चौक, महात्मा फुले चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली. या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला.


विजयादशमीच्या दिवशी १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेमुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सामाजिक समता, मानवता आणि परिवर्तनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बुद्धांच्या विचारांनुसार समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प या महोत्सवाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.


कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे पदाधिकारी , पंढरपूर मध्यवर्ती जयंती समिती , तसेच उपस्थित राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे सामूहिक शपथग्रहण केले. यानंतर महोत्सवाची सांगता झाली.

भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष राहुल सर्वगोड, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले, सैनिक हनुमंत बंगाळे, पंढरपूर मध्यवर्ती जयंती महोत्सव अध्यक्ष अभिराज उबाळे,जितेंद्र सर्वगोड, दिनेश धनवले, रवी सर्वगोड, चेअरमन संतोष सर्व गोड, प्रभाकर सरवदे, मोहन गौडदोरू , अविनाश चंदनशिवे, अतुल चव्हाण, अतुल साळवे, बाप्पू डावरे, दत्ता सरवदे, अमर शेंबडे,आकाश वाघमारे, आर.पी.आय पक्षाचे सुनील सर्व गोड,आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, संजय सावंत,फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे, दादासाहेब दोडके सर राजेंद्र पाराध्यें सर, सल्लागार आर.पी. कांबळे,श्रीकांत कसबे   पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे,, मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, गौतम विद्यालयाचे नितीन कांबळे सर व सर्व शिक्षक  माजी मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांच्यासह  पदाधिकारी, उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close