अपक्ष उमेदवार कपिल कोळी यांचा शैलाताई गोडसे यांना पाठिंबा
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर(प्रतिनिधी):-गेली पन्नास वर्ष कोळी समाजाच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष दिले नाही. दाखल्याचा प्रश्न प्रलंबित आहे.या प्रश्ना बाबत विधानसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन दिल्यामुळे आपण शैलाताई गोडसे यांना जाहीर पांठीबा देत आहोत.असे खुलासा पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणूक लढवत असणारे अपक्ष उमेदवार कपिल शंकर कोळी यांनी केला.पाठींब्याचे पत्र अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना दिले.यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख उपस्थित होते.
पंढरपूर साठी एमआयडीसी,मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावचा पाणी प्रश्न,विधानसभा निवडणुकीत महिलांना५०%आरक्षण यासाठी शैलाताई गोडसे या निश्चितच आवाज उठवून पाठपुरावा करतील असा विश्वास कपिल कोळी यांनी या वेळी व्यक्त केला. कोळी बांधव व हितचिंतकानी मला मते न देता शैलाताई गोडसे यांना आपले मत देऊन विजयी करावे असे आवहान त्यांनी केले.