Uncategorized

तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा कार्यक्रम करा मी राज्याचा कार्यक्रम करतो-देवेंद्र फडणवीस

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर( प्रतिनिधि) पंढरपुर-मंगळवेढ़ा मतदार संघाची निवडणूक ही एका मतदारसंघ पूरती या निमित्ताने महाआघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा मतदारापुढे वाचला तर संपूर्ण राज्याला तो समजणार आहे. या मतदारसंघातील मतदारानो तुम्ही या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास निवडून देऊन तुम्ही ईथला कार्यक्रम केला तर मी राज्याचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी घेतो असे आवहान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केले ते पंढरपुर मंगळवेढ़ा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ टिळक स्मारक मंदिर पंढरपुर हे येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी महाआघाडी सरकार वर टिका केली.पुढे ते म्हणाले की, भारतभर कोरोना चा कहर असताना इतर राज्यानी विशेष पैकेज दिले पण महाराष्ट्र सरकार ने पैकेज जाहीर केले नाही. हे लबाड सरकार आहे.जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही. विधानसभा सुरु होण्यापूर्वी विज कनेक्शन कट करण्यास स्थगिती दिली व अधीवेशन संपण्यापूर्वीच स्थगिती उठवली.जनतेला मदत करण्याऐवजी सुलतानी वसुली सुरु केली आहे. हे सरकार गोरगरीब, दीनदलीत,आदिवासी, शेतकरी यांचे हे सरकार नसुन बिल्डरांना मदत करणारे सरकार आहे. पोलीसा मार्फत खंडणी वसूल करणारे सरकार आहे.
गेल्या पाच वर्षात पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात तिनशे कोटींची कामे केली आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकारने युध्द पातळीवर प्रयत्न केले नाहीत असा त्यांनी आरोप केला.समाधान आवताडे यांच्या पाठीमागे प्रशांत परिचारक उभारले असल्याने विजय निश्चितच होणार आहे असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले.
याप्रचार सभेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, सदाभाऊ खोत,आ.प्रशांतराव परिचारक,भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ,उमेदवार समाधान आवताडे यांनी आपली भुमिका मांडली.
यावेळी मंचकावर माजीमंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा.जयसिध्देश्वर,खा.रणजित निंबाळकर, आ.रमेश पाटील, आ.राम सातपुते, आ.जयकुमार गोरे,रमेश कुल,बाळा भेगडे पाशा पटेल,जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अनुसुचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, रासप नेते पंकज देवकते रिपाइंचे रिपाई ,डीएसएस बहुजन समता पार्टी चे पदाधिकारी यांचेसह जि.प.सदस्य, पचायत समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close