Uncategorized

पंढरपूर मर्चंट को-ओप बँकेला ३ कोटी ६१ हजार नफा:. चेअरमन अमरजित पाटील 

६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :- पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गाची बँक म्हणून निर्माण झालेल्या आणि आता सर्वसामान्य पंढरपूरकरांची बँक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या दि.पंढरपूर मर्चंट को-ओप बँकेला आर्थिक वर्ष २०२५-२६ यामध्ये ३ कोटी ६१ हजार ४११ इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी दिली.

बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेच्या वि.औ.तथा बाबुराव म्हामाने सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या व उत्सहाच्या वातावरणात पार पडली.सभेच्या सुरवातीला बँकेचे संस्थापक संचालक कै.बाबुराव म्हमाने यांच्या पुतळ्याला संचालक मंडळाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.आर्थिक वर्षात देशात,राज्यात विविध कारणांनी दुःखद निधन झालेल्या नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

सभेला संबोधित करताना बँकेचे चेअरमन अमरजित पाटील यांनी गेल्या वर्षभरातील बँकेच्या प्रगतीचा अहवाल उपस्थित सभासद वर्गासमोर मांडला.यामध्ये प्रामुख्याने बँक कर्मचारी वर्गासाठी यशदाचे मास्टर ट्रेनर ऍडव्होकेट गणेश हलकारे यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.त्याच बरोबर मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करणारी मर्चंट बँक ही आपली पंढरपूर शहर तालुक्यातील पहिली बँक ठरली असल्याचे सांगितले.बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेचा उद्घाटन समारंभ राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते करण्यात आल्याचे सांगितले.तसेच बँकेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी बँकेच्या संपूर्ण वर्षांच्या कामकाजाचे वर्क कॅलेंडर बनवण्यात आल्याचे तसेच प्रत्येक कर्ज प्रकरणाच्या फाईलला इंडेक्स लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बँकेच्या वतीने २०२४ सालापासून शासनाच्या विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची सुरवात बँकेमार्फत करण्यात आल्याचे सांगितले.सदर कर्ज प्रकरणापैकी एक ही कर्ज प्रकरण आज तागायात पर्यंत थकीत नसल्याचे त्यांनी सांगितले.महामंडळाच्या कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून आपला व्यवसाय यशस्वी करणाऱ्या नवं उद्योजकांचा बँकेच्या वतीने युवा उद्योजक सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात आल्याचेही चेयरमन अमरजित पाटील यांनी सांगितले.सन २०२५-२६ वर्षांकरिता बँकेला लेखापरीक्षण वर्ग अ मिळालेला असून,बँकेने गेल्या २० वर्षाहून अधिक आपला लेखापरीक्षण वर्ग अ कायम ठेवलेला आहे.चालू आर्थिक वर्षासाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून बँकेच्या आय टी विभागाचे चेयरमन,व्हॉईस चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आपल्या बँकेने नुकताच ३०० कोटींच्या ठेविंचा टप्पा पार केल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक सोमनाथ डोंबे यांनी दिली.सभेमध्ये बँकेचे ज्येष्ठ सभासद सुभाष भोसले,संजय अभ्यंकर,रमेश घळसासी,शेखर भोसले,रामकृष्ण जवळेकर यांच्यासह अनेक सभासदांनी बँकेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे अभिनंदन केले.व बँकेसाठी सुसज्ज अशी पाच मजली इमारत बांधावी असे उपस्थित सभासदांनी सुचवले त्यास सर्व सभासदानी एकमताने मंजुरी दिली मा.चेअरमन व संचालक मंडळांनी भविष्यात आवश्य सुसज्ज अशी इमारत लवकरच बांधण्यात येईल असे नमूद केले.सभेसाठी बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार परदेशी,ज्येष्ठ संचालक सोमनाथ डोंबे,नागेश भोसले,राजेंद्र फडे,शीतल तंबोली,मॅनेजमेंट कमिटीच्या अध्यक्ष सौ.मंजुश्री भोसले,विजयकुमार कोठारी,भगीरथ म्हामाने,राहुल शिंदे नाईक,आदित्य फत्तेपूरकर,वसंत शिखरे,भारत भिंगे,संजय जवंजाळ,सौ.सुनंदा गांधी यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हामाने,उपव्यास्थपक रमेश कुलकर्णी यांच्यासह सर्व शाखाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.सभेच्या शेवटी बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close