स्वरसंगम कलापथक लोकनाट्य बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांचा रथाची पूजा उत्साहात संपन्न


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पुणे ता. १७ – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यातर्फे, आषाढी यात्रा २०२६ अंतर्गत, संत तुकाराम महाराजांचो पालखी सोहळ्यातील, ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक यांच्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध मानधन सन्मान योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी, स्वरसंगम कलापथक लोकनाट्य बहुउदेशीय संस्था, सोलापूर यांचा रथातील विठ्ठल-कक्मिणीची पूजा, बैलवाडी येथील मेंढ्यांच्या रिंगण सोहळ्यात, सांस्कृतिक कार्य विभागाचे सन्माननीय मंत्री आशिष शेलार यांनी सपत्नीक पूजा केली.
यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (मामा), सांस्कृतिक विभागाचे संचालक पांडे साहेब, धुमाळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कलापथकाद्वारे पुणे ते पंढरपूर दरम्यान, वारीतील ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक यांना मनोरंजक पद्धतीने पुरस्कार व मानधन सन्मान योजनांची माहिती दिली जात असून, या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कलापथकात शाहीर संजय रणदिवे, शाहीर रमेश खाडे, शाहीर सतीश रणगुर, शाहीर चंद्रसेन पांडे तसेच, सुमन रणदिवे, प्रतिभा साठे, संगीत जाधव, जोतिबा शिंदे, प्रथमेश रणदिवे, किसन सितारे (हार्मोनियम) महादेव सितारे (तबला) यांचा सहभाग आहे.




