Uncategorized

गरजवंतांची गरज भागविण्यासाठी प्रयत्नशील असणे हा आनंद खूपच मोठा आहे.! -कवी रवि वसंत सोनार

सोनार दाम्पत्यांकडून मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमास पाण्याच्या टाक्या भेट...!

वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक होणाऱ्या खर्चांना सोनार परिवाराचा फाटा…!

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी) : “आपले सण आणि उत्सव साजरे करत असताना आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गरजवंतांची यथाशक्ती गरज भागवल्यानंतर मनाला मिळणारा आनंद हा कितीतरी मोठा असतो.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांचे सुपुत्र ओंकार रवि सोनार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या माध्यमातून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील मागणीनुसार पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भेट देण्या प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की “आपले वाढदिवस व सण उत्सव हे नक्कीच साजरे करावेत. परंतु अशा प्रसंगी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गरजवंतांना थोडीफार मदत करणे हे सुद्धा नक्कीच आवश्यक आहे. आम्ही सखा सखी यथाशक्ती या गोष्टीचे पालन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तसाच इतरांनीही यथाशक्ती प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे.”
याप्रसंगी सौ. सविता रवि सोनार सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक  राक्षे तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी बोलताना  सचिन कुलकर्णी म्हणाले की “वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक होणाऱ्या सर्व खर्चांना फाटा देत मागील जवळपास पंधरा वर्षे सातत्याने वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्था यांना वेगवेगळ्या औचित्याने मदत व सहकार्य करण्याचे पंढरपूरचे आदर्श सखा-सखी असणाऱ्या सोनार दांपत्यांचे काम हे खरोखरच कौतुकास्पद आहे.” यावेळी बोलताना वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक  राक्षे म्हणाले की “पंढरपूरचे आदर्श पती-पत्नी असणाऱ्या सोनार दांपत्यांकडून मागील अनेक वर्षांपासून नेहमीच पूर्व चौकशी करून वृद्धाश्रमास लागणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी दिल्या जातात. ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची अशी आहे.”
यावेळी मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला व पुरुषांना मिष्टान्न वाटप करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी गीताच्या माध्यमातून चि. ओंकार सोनार यास शुभाशीर्वाद दिले. मुलाच्या वाढदिवसाच्या औचित्याने पंढरपूरचे आदर्श पती-पत्नी असणारे श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या या उपक्रमामुळे पंढरपूर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close