मतदार संघातील प्रश्न सोबतच वैयक्तिक प्रश्नही सोडवणार : दिलीपबापू धोत्रे
प्रभाग क्रमांक 17 येथील जनसंपर्क कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पंढरपूर मतदार संघातील मतदारांनी न भूतो न भविष्यती अशी आम्हास यश दिले आहे. डॉ. प्रणिताताई भालके यांचा महाराष्ट्रात निवडून येण्याचा विक्रम झाला आहे.त्यामुळे मतदार संघातील मतदार बंधू हे आमचे कुटुंबातील झाले आहेत.त्यामुळे त्यांची जबाबदारी आमचे खांद्यावर आलेली आहे. त्यांचे मतदारसंघातील जे काही प्रश्न आहेत ते तर आम्ही सोडवणार आहोतच परंतु त्यांचे वैयक्तिक ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा आम्ही सोडवणार आहोत असे आश्वासन मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या भाषणात दिले.

प्रभाग 17 येथे नगरसेविका सौ.माधुरी दिलीपबापू धोत्रे व लोकेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील, विठ्ठल परिवाराचे नेते तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ दादा भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेशनाना साठे, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगिरथ दादा भालके, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )चे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेशनाना साठे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विजयी उमेदवारांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉ. प्रणिता ताई भालके, सर्व नूतन नगरसेवक तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार व विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मतदारसंघातील उपस्थित मतदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम गोगाव सर यांनी केले.




