जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल आजपासून सुरु
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर/ विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक पक्ष, संघटना,व्यक्ती यांनी व्रुतपत्र चालवली असून त्यामुळे अपेक्षित परिणाम ही निघाले आहेत. म फुले यांनी आपली चळवळ चालवित असताना “दीनबंधु”हे मुखपत्र सुरु केले होते.या मुखपत्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. राजर्षी शाहू महाराजांनी चळवळीच्या अनेक व्रुतपत्राला सढळ हाताने मदत केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळ चालविण्यासाठी मुकनायक,बहिष्कृत भारत, जनता, प्रबुध्द भारत या व्रुतपत्राची निर्मिती केली. चळवळ चालविण्यासाठी व्रुतपत्राची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.ज्याचळवळीस व्रुतपत्र नाही ती चळवळ पंख छाटलेल्या पक्षासारखी आहे.असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते.नंतरच्या काळात अनेक पक्ष,संघटना,व्यक्ती यांनी अनेक व्रुतपत्रे सुरु केली व आपापल्या ताकदीप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न केला. गेली बारा वर्ष आम्ही साप्ताहिक जोशाबा टाईम्स अनेक अडचणीवर मात करीत सुरू ठेवले आहे.बदलत्या काळात प्रबोधनाची साधने बदलत गेली ईलेक्टाँनिक मिडिया व सोशलमिडीया द्वारे लोकजागृती होत आहे. फेसबुक, व्हाट्सअप,ट्विटर, द्वारे जग जवळ येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही साप्ताहिक जोशाबा टाईम्स चे अस्तित्व अबाधित ठेवून अनेक हितचिंतकाचे आग्रहानुसार या माध्यमात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहोत.आमचे चळवळीतील सहकारी रवि सर्वगोड यांचे प्रयत्नातून हा प्रयत्न यशस्वी होत आहे.आज महात्मा जोतिबा फुले यांचे जयंती निमित्त” जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल “मान्यवरांचे उपस्थित करतांना विशेष आनंद होत आहे. त्याचे चळवळीतील सर्वजण स्वागत करतील व भरभरून साथ देतील अशी अपेक्षा आहे.