मतदाना दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर दि. 10: पंढरपूर विधासभा पोटनिवडणूकीसाठी मतदारसंघातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी 17 एप्रिल 2021 रोजी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत जाहिर करण्यात आली आहे.त्यानुसार उद्योग, उर्जा, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांच्या मालकांनी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचनांचे अनुपालन करावे. याबाबत काही तक्रार आल्यास संबंधित आस्थापना विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. असे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी कळवले आहे.
याबाबत तक्रार असल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा संपर्क क्रमांक-0217-2728401 असा आहे. तसेच नियंत्रणकक्ष प्रमुख म्हणून सरकारी कामगार अधिकारी एस.डी.राजपूत यांची नेमणूक केली असून, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9975556602 असा आहे, असेही श्री.येलगुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.