Uncategorized

सरकार ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचा कारभारी निवडला पाहिजे :प्रशांतराव परिचारक

पंढरपूरचा विकास समोर ठेऊन भाजपा उमेदवाराला विजयी करा असे केले आवाहन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सरकार ज्या पक्षाचे आहे त्याच पक्षाचा कारभारी निवडला पाहिजे, याचा फायदा सगळ्यांना होणार असून रोजगार मिळणार आहे. सर्वात जास्त गरीबी ही आज मुस्लिम समाजात आहे, माझे काही बिघडत नाही, मी आमदार, खासदार नाही, पण तरीही माझ्या नावाचा वापर करून राजकारण सुरू आहे, आम्ही संपणार नाही. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,आवाहन माजी आमदार  प्रशांतराव परिचारक यांनी केले.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कालिकादेवी चौक येथे झालेल्या कॉर्नर प्रचारसभेत जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व जनतेसाठी त्यांची गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही देऊन या परिसरातील मुस्लिम व ईतर समाजातील लोकांची मने जिंकली.

या प्रचारसभेत व्यासपीठावर इक्बाल बागवान, उमेदवार सुजीत सर्वगोड, रेहाना बोहरी, गुरु दोडिया, भागवत बडवे, मानेताई तसेच या भागातील स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले मोठे मालक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी कधीही जात, धर्म, पंथ हे पाहून राजकारण केले नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. आज केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे.

पुर्वी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि माजी नगराध्यक्ष वा ना उत्पात यांनी फरशी गल्ली या मंदिर परिसरात इब्राहिम बोहरी यांना निवडून आणले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना गोरगरीब जनतेसाठी आणल्या लाडकी बहीण योजना जात पाहून दिली नाही, १८ कोटी शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री फंडातून कर्ज दिले जात आहे गरिबांसाठी पाच लाख रुपयांची आरोग्यविमा योजना सुरू केली आहे. म्हणुन भाजप व मित्र आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असे  त्यांनी  आवाहन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close