सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रँच्युएटी व सातव्या वेतन फरकाची रक्कम लवकर मिळावी हि नगर परिषदे कडे कर्मचाऱ्यांची मागणी
सेवानिवृत्ती वेतन वेळेवर मिळावे व आर्थिक ताण कमी करावा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-सेवानिवृत्त होऊन दिड वर्ष होऊन गेले तरी अद्याप ग्रच्युएटीची रक्कम वारंवार मागणी करुन अद्याप मिळाली नाही.ती त्वरीत मिळावी अशी मागणी सेवानिवृत्त सफाई कर्मचारी ज्ञानेश्वर गोविंद वाघमारे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे फरकाची रक्कम अपवाद वगळता अनेक कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हि रक्कम अग्रक्रमाने मिळावी.तसेच सेवानिवृत्ती वेतन(पेन्शन) १ ते ७ तारखेच्या दरम्यान मिळावी तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळाली तर आर्थिक अडचणी निर्माण होऊन उदरनिर्वाह करणे जिकीरीचे होत आहे.या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याच मागण्या आहेत.असे या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाच्या प्रति नगरविकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व मागण्याचा निर्णय लवकर घेऊन सदर रक्कम अदा केली जाईल असे आश्वासन दिले.यावेळी ज्ञानेश्वर वाघमारे,माजी नगरसेवक अंबादास वायदंडे,जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, महेश गायकवाड उपस्थित होते.