भूमिहीन शेतमालक होण्यासाठी सबलीकरण योजनेचा लढा तीव्र करणार -नेताजी अवघडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
मंगळवेढा:-पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी समाज कल्याण खात्याकडील कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना ही जाचक अटीमुळे प्रभावीपणे राबवली जात नसल्यामुळे प्रा. सुभाष वायदंडे यांनी महाराष्ट्रभर पुरोर्गामी संघर्ष परिषदेच्या वतीने सबलीकरण योजनेचा लढा चालू ठेवला असून मागासवर्गीय समाजाला शेत जमिनीत शेतमजूर म्हणून राबता, राबता शेतीचा मालक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सबलीकरण योजनेमध्ये असलेल्या अनेक जाचक अटी दूर करण्यासाठी शासन दरबारी निर्णय करण्यासाठी भाग पाडणार असून संपूर्ण महाराष्ट्रभर सबलीकरण योजनेच्या लढ्याची तीव्रता वाढवणार असल्याची भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष नेताजीराव अवघडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना नेताजीराव अवघडे म्हणाले की राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना भेटून सदर योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी निवेदन देणार असून त्याचाच पहिला टप्पा म्हणून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश (भाऊ) खाडे यांना 13 एप्रिल रोजी मिरज येथे निवेदन देणार असल्याचे शेवटी म्हटले आहे.



