Uncategorized

मातंग समाज कृती समिती सोलापूर यांचा बहुजन समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न…

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

सोलापूर :-जी गोष्ट समाजाच्या हिताची आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आम्ही समाज माध्यमांवर लढत आहोत सर्व प्रकारच्या स्टेटस ने जीवना मध्ये पुढे जायचं असेल तर एकच मार्ग आहे ते म्हणजे शिक्षण.. तुमचा वेळ शिक्षणावर केंद्रित करा शिक्षणाच्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळेल डॉल्बी समोर नाचून शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्या समाजामध्ये किती डॉक्टर, वकील इंजिनियर, प्राध्यापक किती आहेत व भविष्यात जास्त कसे करता येईल हे समाजाचे खरे शक्ती प्रदर्शन आहे असे प्रतिपादन…कार्यक्रमाचे अध्यक्ष_सोलापूर आयुक्त एम राजकुमार यांनी केले .. ते  _राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून_ मातंग समाज कृती समिती सोलापूर यांच्या वतीने  समाजकल्याण केंद्र रंग भवन चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी.. बहुजन समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रमात बोलत होते.  तसेच  यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग सुलोचना सोनवणे या बोलताना म्हणाल्याकी मी ग्रामीण  भागातून  आलेली आहे दूरदृष्टी ठेवून अभ्यास करा इच्छाशक्ती मधूनच माणूस घडत असतो स्पर्धा परीक्षेची तयारी करा तरच यशस्वी होता येते असे मार्गदर्शन केले.

.मातंग समाज कृती समिती शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने..10 वी 12 वी व तत्सम परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा _कौतुक सोहळा_ संपन्न झाला.

_विशेष सत्कार_
MPSC स्पर्धा परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेली
_कु वैष्णवी राम गायकवाड_

सिंगापूर येथे झालेल्या एशिया कप 2025 भारताकडून या स्पर्धेत भाग घेऊन धनुर विद्या या खेळाच्या प्रकारात रौप्य पदक मिळवलेली
_कु तनिष्का निलकुमार ठोकळ_

पती निधनानंतर आलेल्या अडचणीला सामोरे जाऊन आणि कोणत्याही विरोधाला न जुमानता शिक्षण घेऊन पदवीधर होऊन स्वयं कर्तुत्वाचा ठसा उमटविणारी
_श्रीमती विजया महालिंग महापुरे_

रत्नागिरी येथे झालेल्या महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 या क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेऊन सोलापूरचे नाव उज्वल करणारी
_कु नंदिनी अशोक सोनवणे_

पोलीस बंदोबस्ताची व्यस्त ड्युटी करत करत अभ्यास करून कायद्याचे पदवी मिळवली सोलापूर शहर आयुक्तालयातील संलग्न जेल रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी
_पोलीस संतोष सुधाकर वायदंडे_

झोपडपट्टी परिसरात राहून  जिद्द व चिकाटीच्या   जोरावर शिक्षण घेऊन कायद्याची पदवी मिळवनारे
ऍड.उमेश पवार ( पंढरपूर )

या सर्वांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांना शॉल,पुष्प  व भारतीय संविधानाची उद्देशिका  देऊन यथोचित सन्मान करण्यात आला…

तसेच बहुजनातील 10 वी 12 वी उत्तीर्ण झालेल्या 75 विद्यार्थ्यांचा डिक्शनरी, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव असल्याने संविधानाची उद्देशिका  व पुष्प  देऊन यथोचित सत्कार करण्यात आला..

यावेळी….अध्यक्ष युवराज पवार,रमेश बोराडे,राजू क्षीरसागर,श्रीकांत देडे, ऍड.शैलेश पोटफोडे, प्रभाकर कांबळे, बालाजी खंदारे,विश्ववेंद्र मोरे,शशांक कांबळे,शिवाजी गायकवाड,शिरा आडगळे,दिलीप कांबळे,  डोलारे,मसू रणदिवे,विकी पवार, ज्योतिबा पारखे, महेश जाधव,महेश भालेराव,प्रशांत पाटोळे व विद्यार्थ्यांचे पालक आणि समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close