Uncategorized

झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा:रवी सर्वगोड

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर (प्रतिनिधी):पंढरपूर शहरातील घोषित झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा (PMAY) लाभ मिळावा, अशी मागणी बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष रवी सर्वगोड यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान आवास योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत घरबांधणीसाठी अनुदान तसेच गृहकर्जावरील व्याज सवलत मिळते. मात्र, पंढरपूरमधील अनेक घोषित झोपडपट्टीधारक कुटुंबांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी खंत सर्वगोड यांनी व्यक्त केली.
“पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे विविध समाजघटकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. विशेषतः मुस्लिम, ओबीसी, मराठा आणि इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे झोपडपट्ट्यांमध्ये हालाखीच्या परिस्थितीत राहतात. त्यांना गृहनिर्माणाची सुविधा मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेनं या मागणीचा गांभीर्याने विचार करून पात्र झोपडपट्टीधारकांना तातडीने PMAY चा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा रवी सर्वगोड यांनी व्यक्त केली.
यावेळेस सतीश सर्वगोड, राजू सर्वगोड, प्रफुल्ल कांबळे, कृष्णा सर्वगोड, शौकत पठाण, लाल महमद शेख, साहिल तांबोळी, स्वप्नील कांबळे, राहील झारी, साहिल पठाण, तहा मणेरी, उमेश आगवणे, स्वप्नील सर्वगोड, भूषण सर्वगोड, रिहान शेख, रशीद तांबोळी, शरद सोनवणे, सिद्धनाथ सावंत, जुबेर बागवान, अमोल पाटील, सूरज साखरे आदी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close