Uncategorized

पंढरपूर शहरातील अतिधोकादायक इमारती, मठात वास्तव्यस प्रतिबंध:सचिन इथापे

पंढरपूर शहरातील अतिधोकादायक इमारती, मठात वास्तव्यस प्रतिबंध:सचिन इथापे

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि.२९):-आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळयासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरला येतात. त्यासोबत लाखो भाविक पंढरपूर पालखीसोहळासोबत येतात. सदर भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडणे, यावर प्रशासनाकडून प्रथम प्राधान्या दिले आहे. अतिधोकादायक इमारती, मठ दि. २९ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत वापर करणेस तसेच त्याठिकाणी वास्तव्य करणेस प्रतिबंध करणेत येत असुन याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.

पंढरपूर शहरात यात्रा सोहळयासाठी विविध भागातून येणारे भाविक/वारकरी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील मठ, वाडे, इमारती आदी ठिकाणी वास्तव्य करतात. त्यापैकी काही इमारती, मठ बंद व जुने आहेत. यात्रा कालावधीत भाविक त्या ठिकाणी वास्तव्यास राहतात. बंद असलेले तसेच जुन्या इमारती व मठ यांचे कोणत्याही प्रकारचे परीक्षण झालेले नाही.
मानवी जीवितास धोका होवू शकतो. यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील धोकादायक इमारती, मठ यांचेपासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांच्या जीवितास धोका निर्माण होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारीत करण्यात आले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) मला प्राप्त अधिकाराचा वापर करून,उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.


००००००००

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close