विवेक वर्धिनीची सेजल चव्हाण आर्चरी फिटा राऊंड स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम

सेजल चव्हाण हिचा सत्कार करताना संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके प्राचार्य राजेंद्र पाराध्ये व इतर पदाधिकारी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी सायन्स मध्ये शिकणारी कु. सेजल शिवाजी चव्हाण ही विद्यार्थिनी अमरावती येथे झालेल्या आर्चरी फीटा राऊंड या क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी झाली आहे.त्याबद्दल संस्थेचे सचिव ॲड वैभव टोमके यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष शिवाजी वाघ,
सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर व सर्व संस्था
संचालक,आजीव सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, मुख्य लिपिक हनुमंत मोरे,क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे, राहुल दळवी व सर्व शिक्षक,पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.