वकील दिनानिमित्त विवेक वर्धिनीत ॲड. वैभव टोमके यांचा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे वकील(ॲडव्होकेट) दिनानिमित्त संस्थेचे सचिव ॲड. वैभव टोमके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ॲडव्होकेट हे पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी जसे प्रयत्न करतात तसेच शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा असे मत प्रकट केले.प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते ॲड. टोमके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी ज्यूनिअर विभाग प्रमुख प्रा. उत्तरेश्वर मुंढे ,प्रशालेतील शिक्षक राजुभाई मुलाणी, सांस्कृतीक विभाग प्रमुख शिवाजीराव येडवे,जैनुद्दीन शेख,अनिल सोनार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


