सत्ता गरीबांच्या हातात जात नाही तोपर्यंत बदल होत नाही-अँड. बाळासाहेब आंबेडकर
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर(प्रतिनिधी):-सत्ता ही धनदांडग्याच्या हातात राहीली पाहिजे या साठी सारे पक्ष प्रयत्न करीत आहेत हे सारे मनुवादी आहेत.जोपर्यंत सत्ता गरीबांच्या हातात जात नाही तोपर्यंत बदल होणार नाही. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. पंढरपूर. मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणुकीत वंचित बहुते वंचित आघाडीचे उमेदवार बिराप्पा मोटे यांच्या गौतम विद्यालय येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,धनगर समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ला आम्ही उमेदवारी दिली असून ते आलुतेदार बलुतेदार यांचे खरे प्रतिनिधी आहेतकाही लोक आपल्यात बदल झालेला दाखवतात पण तो बदल गरजेनुसार झालेला असतो.मानसिक व विचारात बदल झालेला नाही हे ओळखले पाहिजे. सत्ताधारी मंडळी राजकीय , आर्थिक व शैक्षणिक आरक्षण संपवीण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकत्याच विदर्भातील अनेक ग्रामपंचायत निवडणुका संपन्न झाल्या. यामध्ये इतर मागास वर्गीय (ओबीसी)प्रभागात निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करावी व त्यांनी सर्व सामान्य मतदार संघातुन निवडून यावे असा प्रस्ताव ग्रामविकास मंत्र्याने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे त्यांनी आवहान केले.
पुढे बोलताना अँड.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की कोरोना परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर, अधिकारी, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांनी आटोकाट प्रयत्न केले वारंवार लाँकडाऊन लावून त्यांचा अपमान केला जात आहे.गोरगरीबांचे या लाँकडाऊन मुळे हाल होत आहेत यात आलुतेदार-बलुतेदार भरडला जात आहे त्यामुळे सातत्याने लाँकडाऊन करु नये अन्यथा आम्हाला शटर खोलो चळवळ चालवाली लागेल असे सांगुन सत्ताधारी व विरोधी पक्षावर परखड टीका केली. व वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी उमेदवार बिराप्पा मोटे,सर्वजीत बनसोडे, सुजीत सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी राज्यप्रवक्ते आनंद चंदनशिवे, दिशा शेख यांचे सह अनेक जण उपस्थित होते.