महायुतीने आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना आदीवासी मंत्रीपद द्यावे – गणेश अंकुशराव
महायुतीने आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना आदीवासी मंत्रीपद द्यावे – गणेश अंकुशराव
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) : आदिवासी कोळी जमातीचे राज्याचे नेते, आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी , टोकरे कोळी जमातीचे नेते, शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना आदिवासी विकास मंत्री पद देण्यात यावे अशी मागणी पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा आदिवासी कोळी जमातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्र प्रश्न, पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकाचा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी व आदिवासी कोळी जमातीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या समाजाच्या नेत्याला आदिवासी मंत्रीपद मिळणं गरजेचं आहे. आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे हे मंत्री झाले तर आम्हाला आमचा हक्काचा विश्विसु मंत्री भेटणार आहे. तरी महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी राज्यातील बहुसंख्य असलेल्या कोळी जमातीच्या भावना व पाठिंबा लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांना आदीवासी मंत्री पद द्यावे अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.