Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून समाधानदादा अवताडे यांचा 8430मतांनी विजय

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर प्रतिनिधी….
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये चुरशीची झालेली ही निवडणूक या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा एकदा विजय प्राप्त करत ही विजयाची परंपरा राखली.  भाजपचे उमेदवार समाधानदादा अवताडे यांना 1,25,163 मते मिळाली तर  काँग्रेसचे उमेदवार भगीरथदादा भालके यांना 1,16,733 यांना  मते मिळाली.8430 मतांनी समाधानदादा अवताडे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी घोषित केले. रात्री उशिरा निकाल घोषित झाला.

अन्य उमेदवाराना पुढील प्रमाणे मते मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेस -अनिलदादा सावंत  —  10217

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -दिलीपबापू धोत्रे —2568

बहुजन समाज पार्टी -दत्ता वाडेकर —677

वंचित बहुजन आघाडी -अशोक माने –1464

राष्ट्रीय समाज पक्ष -पंकज देवकते –855

राष्ट्रीय लोकहितावादी पार्टी –राजेंद्र बापू बेडरे -88

अखिल भारतीय सेना -सुदर्शन खंदारे –87

अपक्ष -अबुलरौफ मुलाणी –104

अपक्ष -आण्णा मस्के –117

अपक्ष —  अशपान सय्यद –252

अपक्ष – अमोल गायकवाड —269

अपक्ष — तुळजाराम बंदपट्टे –126

अपक्ष — दर्शना माने देशमुख –197

अपक्ष — निशिकांत पाटील –663

अपक्ष —  बिराप्पा मोटे —992–

अपक्ष — युसूफ मुजावर –93

अपक्ष – –  ऍड. बापू मेटकरी –183

अपक्ष — संजय हणमंत वाघमारे –351

अपक्ष –विठ्ठल भीमराव भोरकडे –279

अपक्ष — श्रीकांत श्रीमंत नलावडे –250

अपक्ष — -सिद्धराम काकांकी –134

अपक्ष –ज्ञानेश्वर अरुण पंचवाघ– 92

चौरंगी लढत होईल असे वाटले होते. परंतु दुरंगीच लढत झाली. महा विकास आघाडी मध्ये अवमेळ झाल्याने त्यांनी दोन उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनिलदादा सावंत यांची उमेदवारी दाखल करुन शेवट पर्यंत प्रयत्न केल्यामुळे त्यांना 10217  मते मिळाली.महाआघाडीचा एकच उमेदवार असता तर त्याला ही मते मिळाली असती.या मत विभागणीमुळे 8430मतांनी भगीरथदादा  भालके यांचा पराभव झाला. व समाधानदादा अवताडे यांचा विजय झाला. पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांचा विजया पर्यंत नेण्यात महत्वाचा वाटा आहे.

दिलीपबापू धोत्रे यांनी गेली पाच वर्ष मोर्चे बांधणी केली होती. वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले. अनेकांना  वैद्यकीय, शैक्षणिक,आर्थिक  मदत केली पण मनसेचे उमेदवार दिलीपबापू यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.ही बाब निश्चितच विचार करन्यास भाग पाडते.

आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रचंड असे विकास कामे खेचून आणलेले आहेत आणि या विकास कामाला गती देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे तीन हजार कोटी रुपयांचे कामे त्यांनी आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आणून सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सुविधा सुख सुविधा त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचा विकास साधण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहॆ.आवताडे यांच्या विजयाचा जल्लोष संपूर्णपणे तालुका शहर व ग्रामीण भागांमधून जल्लोषात साजरा होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close