Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश

चंद्रिका बाबर 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल 

श्रीकांत कसबे

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले. ही स्पर्धा के. एन. भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठातील एकूण आठरा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

दिव्यसाक्षी धोत्रे 

पवन रुपनर 

जयदीप पवार 
यामध्ये ७३ किलो वजनी गटात चंद्रिका बाबर बी.एस्सी भाग २ हिने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे तिची भोपाळ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच जयदीप पवार ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, पवन रुपनर १०० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, दिव्यसाक्षी धोत्रे ५६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, महाविद्यालय विकास समितीमधील सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ. अमर कांबळे व स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल यांनी विशेष अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले व प्रा. अनिल परमार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन क्षेत्रात सिनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी विशेष कौतुक केले.
.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close